जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
व्यवसाय ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 01 September 2026

नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था एक चांगले माध्यम - विशेष सहकार अधिकारी विलास लिंबळे

पतसंस्था समाजाच्या आर्थिक विकासासाठी आहे .कर्ज घेतल्यानंतर ग्राहकांनी वेळेत कर्जफेड करावी.

देहूरोड: नागरिकांच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था एक चांगले माध्यम आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक जण स्वतःचा व्यवसाय करून सन्मानाने कुटुंबाचा विकास करू शकतात, असे प्रतिपादन विशेष सहकार अधिकारी विलास लिंबळे यांनी देहूरोड येथे केले.
देहूरोड येथील जय गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा बाजारपेठेतील वैश्य समाज मंदिर येथे संपन्न झाली. त्यावेळी श्री लिंबळे बोलत होते .
सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक कैलास पानसरे , देहू देरोडचे भाजपचे अध्यक्ष रघुवीर शेलार ,विनायका नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गुरमीतसिंग रत्तू आणि 110 सभासद उपस्थित होते. संचालिका सुनीता काळे यांनी सूत्रसंचालन केले .अहवाल वाचन कर्मचारी शीतल साळुंके मॅडम यांनी केले. उपाध्यक्ष अलकाताई पांडे यांनी अहवाल वाचन केले केले.
पतसंस्थेचे आर्थिक स्थिती उत्तम आहे .पतसंस्थेकडे नऊ कोटी रुपयांच्या ठेवी असून सहा कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे .संस्थेला यावर्षी 40 लाख रुपये इतका नफा झाला आहे .पतसंस्थेने सभासदांना12 टक्के प्रमाणे लाभांश वाटप केले .