जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 01 September 2026

औंध येथील डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल मधील सुधीर वाळेकर यांचा सेवा निवृत्त समारंभ उत्साहात संपन्न.

औंध येथील शाळेत ते मागील २३ वर्षापासून सेवक या पदावर कार्यरत असताना प्रामाणिकपणे सेवा केली.

पुणे: डी. ए. व्ही पब्लिक स्कूल येथील सुधीर वाळेकर यांचा सेवा निवृत्त समारंभ उत्साहात पार पडला.
औंध येथील शाळेत ते मागील २३ वर्षापासून सेवक या पदावर कार्यरत होते.
अतिशय मन मिळाऊ मितभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांच्या प्रति त्यांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली. संस्थेने त्यांच्यावर सोपवलेली सर्व जबाबदारी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली.
शाळेतील प्राचार्य, पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी कोठारी यांनी केले. सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने प्रकाश कांबळे यांनी सुधीर वाळेकर यांच्या सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला. तसेच सेवानिवृत्ती नंतर च्या पुढील काळासाठी उत्तम आरोग्य लाभो ,अशी सदिच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी अभिजित शिंदे, रवींद्र मरळ, मयूर नागरस, मनीष निलंगेकर यांनी अथक परिश्रम घेतले.