जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
व्यवसाय ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 17 August 2026

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सिद्धिविनायक नगरीमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस कामाचा शुभारंभ

सिद्धिविनायक नगरी ते परमार कॉम्प्लेक्स या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाईन घरोघरी लवकरच पोचणार आहे.

निगङी : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सिद्धीविनायक नगरी ते परमार कॉम्प्लेक्स पर्यंतच्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लाईनच्या कामाचा शुभारंभ सोमवारी(ता.17) झाला. सिद्धीविनायकनगरी ते परमार कॉम्प्लेक्स पर्यंत बऱ्याच नागरिकांनी आपल्या परिसरात MNGL ची गॅस लाईन आणावी , अशी मागणी होती.
या कामासाठी पुण्यामधील महाराष्ट्र नॅचरल गॅस ऑफीस मधील संबंधित अधिकारी ओम उगले यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यासाठी तानाजी काळभोर , रवि पनिकर, सचिन दुसाने, सुधीर ढगे पाटील परिश्रम घेतले. यामुळे परिसरातील नागरिकांसाठी
महाराष्ट्र नॅचरल गॅस लाईनच्या कामाचा शुभारंभ आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त निगडी येथील श्री खंडोबा मंदिरात महादेव व श्री खंडोबा च्या मुर्तीची पुजा परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करून कामाची सुरुवात करण्यात आली. ही गॅसची पाईप लाईन श्री खंडोबा मंदिरापासून दत्तनगर,समर्थनगरी, आशिर्वाद काॅलनी, श्री विहार,श्रीनगरी, स्वप्न नगरी,रामकृष्ण सोसायटी,कृष्णा रो.हाऊस,हिल व्हिव रो.हाऊस,सिद्धीविनायकनगरी अशा देहूरोड कँटो.बोर्ड वाॅर्ड क्र.5 मधील सर्व ठिकाणी गॅस लाईन टाकण्यात येणार आहे.गॅस लाईनचे कनेक्शन घेण्यासाठी बऱ्याच नागरिकांनी आणि सोसायटींनी ना हरकत दाखले दिले आहेत, असे तानाजी काळभोर यांनी सांगितले. ज्या नागरिकांना आपल्या घरात गॅस लाईन घ्यायची असेल त्यांनी अर्ज भरून द्यावेत ,असे आवाहन श्री. काळभोर यांनी केले आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅसचे अधिकारी ओम उगले ,नितिन पाटील , ठेकेदार संजय सिंग, सिद्धीविनायक नगरी परिसरातील शिवाजी काळभोर,सचिन दुसाने,इंद्रसिंग राजपूत,सुधीर ढगे पाटील,मनोहर खानझोडे,बन्सी रोडे, शरद कुलकर्णी, बाळासाहेब आवंढे, सर्जेराव जाधव, चंद्रकांत ढोले, अरविंद पाटील, संजय लाड,संजय कदम,गणपत शिरसाट,संजय बनसोडे,अर्जुन कदम,सुनिल रोहिला,शांताराम आरवडे व इतर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन सुधीर ढगे पाटील व योगेश काळभोर यांनी केले. अधिकारी ओम उगले यांनी आभार मानले.