देहू : देहूरोड आणि देहू परिसरातील विविध देवी मातेच्या मंदिरात उत्साहात नवरात्र उत्सवास सुरवात झाली.मावळ तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देहूरोड शेलारवाडीजवळील अमरदेवी मंदिरात नवरात्र उत्सवास सुरवात झाली.
अमरजाई देवस्थानचे वतीने मातेला अभिषेक,घटस्थापना महापुजा झाली.देवस्थानचे वतीने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.मामुर्डी येथील शितळानगर येथील शितळादेवी माता मंदिरात घटस्थापना करून नवरात्र उत्सवास सुरवात झाली.
देहू येथील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यातील विठ्ठलरुक्मिणी मंदिरात संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने घटस्थापना झाली.माळवाडी येथील सावतामाळी प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामातेच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यंदा प्रतिष्ठानने मुंबई येथून मातेची मुर्ती वाजत गाजत आणलेली आहे. नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देहूतील ग्रामदेवी असलेल्या शितळादेवी मातेच्या मंदिरात देहू नगरपंचायतीच्या नगरसेविका मीना कुऱ्हाडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.नगराध्यक्षा स्मिता चव्हाण,नगरसेविका पुजा काळोखे,ज्योती टिळेकर,सपना मोरे,पुजा दिवटे यांच्याहस्ते आरती झाली.
यावेळी स्मिता चव्हाण म्हणाल्या,देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक ती मदत देण्यात येईल.तसेच नवरात्रीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
महालक्ष्मी मित्र मंडळ व शितळादेवी जीर्णोद्धार समितीचे काळुराम चव्हाण,सुभाष कुऱ्हाडे,बाळासाहेब माने,सुरेश कुऱ्हाडे,करण शिंदे,उत्तम जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
देहूतील मोहटा देवी भक्त वंदना कांबळे यांच्या घरी असलेल्या श्री जगदंबा मोहटादेवीच्या मंदिरात घट स्थापना करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील मोहटा गावी देवीचे मुख्य मंदिर आहे. मोहटादेवी म्हणजे माहुरची रेणुका मातेचे अंशात्मक रूप आहे ,असे देवीचे भक्त सदाशिव कांबळे यांनी सांगितले.
वडाचा माळ येथील भैरवनाथ प्रतिष्ठानने भव्य मिरवणूक काढली. नगरसेवक सुधीर उर्फ बंडा काळोखे यांच्या हस्ते आरती झाली.
देहू देहूरोड परिसरात नवरात्र उत्सव उत्साहात सुरु
देहूतील मोहटा देवी भक्त वंदना कांबळे यांच्या हस्ते श्री जगदंबा मोहटादेवीच्या मंदिरात घट स्थापना करण्यात आली.