जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
राजकारण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 09 October 2026

देहूरोड एम.बी. कॅम्प परिसरातील समस्यांची नगरसेवकांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा व सार्वजनिक शौचालयांच्या प्रश्नांवर नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांची पाहणी

देहूरोड : पिंपरी-चिंचवड शहरातील मूलभूत सुविधा सक्षम करण्यासह नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी एम.बी. कॅम्प , किवळे परिसराची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.
या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज लाईनची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल व स्वच्छतेसंदर्भातील प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश नगरसेवक तंतरपाळे यांनी दिले.
तसेच, नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करणे ही आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिसरातील प्रलंबित प्रश्न निर्धारित वेळेत मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्यासाठी संबंधित विभागांनी तत्परतेने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.