जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 06 August 2026

माळीनगर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप

देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, देहू शहर कला व क्रीडा सेल सेलचे अध्यक्ष संदीप बाळासाहेब परंडवाल व मैत्री महिला संघ अध्यक्ष नीलम परंडवाल यांच्या वतीने मोफत छत्री वाटप आयोजन

देहू : माळीनगर येथील महात्मा फुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, देहू शहर कला व क्रीडा सेल व मैत्री महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मोफत छत्री वाटप करण्यात आले.
शहर क्रीडा सेलचे अध्यक्ष संदीप बा. परंडवाल यांनी सांगितले प्राथमिक शाळेतील जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
शाळेचे मुख्याध्यापक विवेक नरवडे, शिक्षक संजय वाघ, शिक्षिका मीनाक्षी वानखेडे, मैत्री महिला संघाच्या अध्यक्षा नीलम परंडवाल ,देहू नगरपंचायत चे सदस्य मयूर टिळेकर, प्रदीप परंडवाल, सदस्य ज्योती टिळेकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक परंडवाल , महिला माळीनगर विभाग अध्यक्ष ज्योती गणेश टिळेकर, देहू सरचिटणीस ज्योती विधाटे, माळीनगर अध्यक्ष तुषार परंडवाल, सामाजिक कार्यकर्ते रुचिर टिळेकर, शुभांगी टिळेकर, सोनम खेडकर , शिल्पा संदीप परंडवाल, पूजा भालेराव यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.