जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 06 September 2026

महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना

खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. स्फोटाचे कारण समजले नाही.

चिंचवड: बिजलीनगर येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे चिंचवड, पिंपरी, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, किवळे,रावेत परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. स्फोटाचे कारण समजले नाही.