जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 19 September 2026

स्वराज टिळेकर यंगस्टार मित्र मंडळाचा कोण बनेगा हजारपती या स्पर्धेचा विजेता

यंगस्टार मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कोण बनेगा हजारपती या स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नांना स्वराज टिळेकर याने बरोबर उत्तरे देऊन 11000 रुपयांचे रोख पारितोषिक

देहू : यंदाच्या गणेशोत्सवा निमित्त माळीनगर मधील मानाचा गणपती ,यंगस्टार मित्र मंडळाने कोण बनेगा हजारपती या स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी (ता. 18 )येथे केले होते. या स्पर्धेत 40 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत कु. स्वराज महेश टिळेकर याने कोण बनेगा हजारपतीचा मान फटकावला.
उत्कृष्ट कामगिरी करत ₹११,०००/- चे रोख बक्षीस पटकावले. तसेच, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना यंग स्टार मित्र मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन
॥ मानाचा गणपती ॥
यंगस्टार मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.