जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 27 August 2026

डाॅ.कीर्ती जाधव यांचे ' बाई तुझ्या अवकाशात ' कवितासंग्रहाचे प्रकाशन

प्रत्येक स्त्रीला तिच्या अवकाशाची जाणीव करून देणारा ' बाई तुझ्या अवकाशात ' हा कवितासंग्रह आहे.

पुणे: पौडरोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील प्राध्यापिका व कवयित्री डाॅ.कीर्ती जाधव लिखित ' बाई तुझ्या अवकाशात ' कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले.
जेष्ठ कवी,समीक्षक व सदस्य भाषा सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.केशव देशमुख , महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्यवाह, जेष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी , काव्यअभ्यासक व समीक्षक डाॅ.सुजाता शेणई, कवी,संपादक व प्रकाशक सृजनसंवादचे गीतेश शिंदे , कवयित्री प्रा.डाॅ.कीर्ती जाधव यांच्या शुभहस्ते झाले . हा हा कार्यक्रम पुण्यातील महाराष्ट्र साहित्य येथे झाला.
प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी,समीक्षक डाॅ.केशव देशमुख म्हणाले, प्रत्येक बाईला तिच्या अवकाशाची जाणीव करून देणारा ' बाई तुझ्या अवकाशात ' हा कवितासंग्रह आहे.
कार्यवाह अंजली कुलकर्णी म्हणाल्या.'बाई तुझ्या अवकाशात ' या संग्रहात डाॅ.कीर्ती जाधव यांनी स्री विशिष्ट अनुभवातून स्त्रियांच्या सनातन दुःखाचे पापुद्रे उलगडले आहेत.
डाॅ. सुजाता शेणई म्हणाल्या, बाईला तिच्या अवकाशाचे भान येवो, यासाठी हा कवितासंग्रह प्रत्येकाने संग्रही ठेवावा .
संपादक गीतेश शिंदे म्हणाले,डाॅ.कीर्ती जाधव यांच्या कविता दर्जेदार व प्रत्येकाला भावतील अशा असल्याने सृजनसंवाद प्रकाशन तर्फे प्रकाशित करताना आनंद होत आहे.
कवितासंग्रहाचे उत्स्फूर्त स्वागत केल्याबद्दल कवयित्री कीर्ती जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक,राजकीय क्षेत्रातील तसेच आजी-माजी मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर सहकारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन चिन्मयी चिटणीस यांनी व आभार डाॅ.अश्विनी दळवी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशांत पवार,हेमलता नवघणे,अथर्व जाधव यांनी विशेष सहकार्य केले.