जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 22 September 2026

देहू येथे कर्मवीर जयंती मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न

कर्मवीर भाऊराव पाटील अमर रहे“’ स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद “आणि रयत शिक्षण संस्थेच्या विचारांचा जयघोष विद्यार्थ्यांनी केला .

देहू : रयत शिक्षण संस्थेचे संत तुकाराम विद्यालय व कै. शंकरराव मोरे ज्युनिअर कॉलेज, संत जिजाबाई कन्या विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १३९ वा कर्मवीर जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी देणगीदार नारायणभाऊ मोरे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य माऊली काळोखे, रत्नमाला करंडे ,वर्षाताई मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालाजी पुजारी, संत तुकाराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या कांबळे, संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी थोरवे व पर्यवेक्षिका स्वालेहा पठाण सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमनकर व लोखंडे उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या लेझीम, झांज पथक व वारकरी पथकाने, तसेच विद्यार्थिनींच्या झांज पथकाने मिरवणुकीची शोभा वाढवली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या लेझीम व लाठी-काठीच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वेशभूषा, लेझीम-झांज पथकांचा ताल आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे देहू परिसरात कर्मवीर जयंतीचा उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान ‘कर्मवीर भाऊराव पाटील अमर रहे“’ स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद “आणि रयत शिक्षण संस्थेच्या विचारांचा जयघोष करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाप्रकारांतून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘बहुजनांच्या शिक्षणासाठी शिक्षण’ या कार्याचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.