जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 03 September 2026

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा

शासनाने प्रात्यक्षिकासाठी विद्यार्थी संख्या 30 ची बॅच केलेली आहे. मात्र प्रचलित नुसार 20 विद्यार्थ्यांची बॅच होती. विद्यार्थी संख्या बदलल्यामुळे राज्यातून दहा हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे.

पुणे: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने अन्यायकारक संच मान्यता रद्द करा व इतर प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित केला आहे. शुक्रवारी (ता.4 )सकाळी 11 वाजता शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे मोर्चाचे आयोजन केलेले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर संजय शिंदे यांनी दिली
आपल्या अस्तित्वासाठी मोठ्या संख्येने हजर राहा आणि
लडेंगे जितेंगे असे आवाहन डॉक्टर संजय शिंदे यांनी केले आहे.