जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 02 September 2026

देहूत गौरी गणपती सजावट स्पर्धा- देहू शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कला क्रीडा सेलच्या वतिने आयोजन

गौरी गणपती सजावट स्पर्धाचे हे तिसरी वर्ष. देहू माळवाडी विठ्ठलवाडी आणि वडाचे माळ या ठिकाणचे स्पर्धक सहभागी होतात.

देहू: देहू शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस कला क्रीडा सेलच्या वतिने गौरी गणपती सजावट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे ३ रे वर्ष आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार , शहराध्यक्ष विवेक काळोखे आणि कला क्रीडा सेलचे अध्यक्ष संदीप परंडवाल , राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष अविनाश भसे इतर पदाधिकारी हे गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत आहेत .
राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या माध्यमातून देखावा परीक्षण करून सर्वोत्तम देखावा निवडला जातो.
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप परंडवाल, देहू महिला शहराध्यक्षा मेघा काळोखे यांनी केले आहे . विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.