जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 24 September 2026

गणपती विसर्जन मिरवणूक गुन्हेविरहित पार पाडावी - पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीच्या मर्यादेचे पालन सर्व गणेश मंडळांना करावे अन्यथा कारवाईला सामोरे जा

देहू: न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांना डीजे संदर्भात कारवाई करावी लागते . त्यामुळे देहूतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी आणि गणपती विसर्जन मिरवणूक गुन्हेविरहित पार पाडावी , असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडल चारच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी गुरुवारी (ता. 24) देहू येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीत केले.
शुक्रवार( ता. 25) गणेश विसर्जन असल्याने देहू ,
देहूरोड परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळे देहू येथे गणपती विसर्जनासाठी येतात .
या पार्श्वभूमीवर देहूतील सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक देहुतील हनुमान मंदिरात देहूरोड पोलिसांनी आयोजित केली होती. त्यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस कर्मचारी दादा वाबळे, प्रदीप काळोखे ,माळीनगर चे पोलीस पाटील चंद्रसेन टिळेकर, देहूचे पोलीस पाटील सुभाष चव्हाण ,गणेश मंडळाचे पदाधिकारी रुचीर टिळेकर, बंडू मोरे व इतर उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे म्हणाले देहूतील परंपरा सार्वजनिक मंडळांनी जपावी विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर मंडळांनी स्वतःहून बंदी घालावी.