जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 23 September 2026

देहू सामाजिक प्रबोधन आणि जिवंत देखाव्यावर भर

गरुड झेप आग्र्याहून सुटका हा जिवंत देखावा शिरीष कुमार मित्र मंडळांनी सादर करून आग्रा शहराची ची हुबेहूब प्रतिकृती तयार केली.

देहू ः देहू परिसरामध्ये सामाजिक प्रबोधन करणारे जिवंत देखावे आणि काही ठिकाणी साधी सजावट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.
शिवाजी चौकात देहूचा राजा, हनुमान मित्र मंडळाने स्टेट्स हा जिवंत देखावा सादर केला आहे.टेस्ट्समुळे माणूस वेळेला आपली कर्तव्यही विसरतो, हे दाखवण्यात आले आहे. २० कलाकारांसह जिवंत देखावा सादर केला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी काळोखे यांनी दिली. मंडळाचे हे ६० वे वर्ष आहे.
बाजारआळीतील शिरिषकुमार मित्र मंडळाने यंदा गरुड झेप आग्र्याहून सुटका हा जिवंत देखावा सादर केला आहे.या देखाव्यात २० लहान मुलांनी सादरीकरण केले आहे. तसेच या देखाव्यात देहूतील इंद्रायणी नदीचा घाटाचा उपयोग करून हुबेहुब आग्रा दाखवण्यात आला आहे.यंदा मंडळाचे ६२ वे वर्ष असल्याचे मंडळाचे अध्यक्ष उमेश मोरे यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराज देऊळवाड्यासमोरील महाद्वारातील मानाचा नवशा गणपती मंडळाने यंदा बारा ज्योर्तिलिंग देखावा सादर केला आहे.संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त संजय मोरे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
डॅा.बाबासाहेब आंबेडकर चौकातील दक्षिणमुखी काळा मारुती मित्र मंडळाने यंदा भव्य मंडप उभारला आहे.तसेच गणेशाची भव्य मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.मंडळाने यंदा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रवि पिंजण मंडळाचे अध्यक्ष आहेत.
मंडईचा राजा समर्थ मित्र मंडळाने यंदा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून भव्य मुर्ती गणेश भक्तांचे आकर्षण आहे.मंडळाचे यंदा ४८ वे वर्ष असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम भालेकर यांनी सांगितले.
गाथा मंदिरासमोरील माळाचा राजा अष्टविनायक मित्र मंडळाने यंदा बाप्पाची आकर्षक गणेशमुर्ती आणि विद्युत रोषणाई केलेली आहे.मंडळाने यंदा महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले असून सामाजिक उपदेश देणारे बॅनर बसविण्यात आले आहे.मंडळाचे यंदा२३ वे वर्ष असून अनिकेत काळोखे अध्यक्ष आहेत.
हगवणे आळीतील अजिंक्य मित्र मंडळाने यंदा भव्य गणेश मुर्तीची स्थापना केलेली असून विविध सामाजिक संदेश देणारे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.मंडळाचे हे ५१ वे वर्ष असून महेश हगवणे अध्यक्ष आहेत.
देहू गावठाणातील शिवशक्ती मित्र मंडळाने भरकटलेला युवक हा जिवंत देखावा सादर केला आहे.अभिजित शिंदे अध्यक्ष आहेत.मंडळाचे हे ४६ वे वर्ष आहे.
महालक्ष्मी मित्र मंडळाने यंदा झेनजी हा जिवंत देखावा सादर केला आहे.२५ कलाकारांनी झेनजी काय करू शकते याचा देखावा सादर केला आहे.मंडळाचे हे ३८ वर्ष असून योगेश पचपिंड अध्यक्ष आहेत.
माळवाडी येथील यंगस्टार मित्र मंडळाने सजावट केली आहे.तसेच मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर,कोन बनेगा हजारपती असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. निखिल मोईकर मंडळाचे अध्यक्ष आहेत.सावतामाळी प्रतिष्ठानने यंदा साधी सजावट केली असून गणरायाची भव्य मूर्ती आकर्षण आहे.