देहू ः गणपती बाप्पा मोरयाच्या नामघोषात विघ्नहर्त्या गणरायाचे देहू आणि परिसरात गणेश भक्तांनी उत्साहात स्वागत केले. परिसरातील गावातील मानाचे गणेशोत्सव मंडळे यांनी सायंकाळी उशिरापर्यत आणि घरगुती गणपतीचे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गणेशभक्तांनी गणरायाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
देहूरोड बाजारपेठेतील एेतिहासिक सुभाष चौकातील शिवस्मारक समिती,अखिल महात्मा फुले भाजी मंडई, देहूरोड कॅटोन्मेंट बोर्ड ,वैश्य समाज मंदिरातील सुदर्शन ,
लष्कराच्या विविध डेपोमध्ये कामगारांच्या वतीने गणेशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यासमोरील मानाचा नवशा गणपती मंडळ,बाजारआळीतील शिऱिषकुमार मित्र मंडळ,शिवाजी चौकातील हनुमान मंडळाने ढोलताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत केले.
घरातील आबालवृदाधांनी गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.सकाळपासून अनेकजण येथील बाजारपेठेत खरेदीसाठी येत होते.फुलांचे हार,द्रुवा,फळे,गुलाल,केवडा,खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.तसेच वीज माळा व आरास करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी दुकानात गर्दी होती.मिठाईच्या दुकानात,मोदक,पेढे,लाडू खरेदीसाठी भाविकांची गर्दी होती.
देहू- देहूरोड परिसरात गणरायाचे उत्साहात स्वागत
गणरायाच्या स्वागतासाठी आणि खरेदीसाठी आबाल वृद्धांची गर्दी देहू बाजारपेठेत उसळली.