जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
राजकारण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 28 August 2026

शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या वतीने विमुक्त जाती दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

विमुक्त जाती दिनानिमित्त ३१ ऑगस्टला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या वतीने विमुक्त जाती दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या सोमवारी (ता.31)सकाळी १० वाजता पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँम्पी थिएटर मध्ये होणार आहे.

ब्रिटिश राजवटीत ‘क्रिमिनल ट्राइब्ज अँक्ट’अंतर्गत काही जाती-जमातींना गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी या जाती-जमातींवरील हा कलंक दूर करून त्यांना ‘विमुक्त जाती’ म्हणून घोषित करण्यात आले. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी ३१ ऑगस्ट हा ‘विमुक्त जाती दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती राहणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालक सोनाली मुळे यांनी कळविली आहे.