आकुर्डी: पोर्टल द्वारे शिक्षण विभागातील रिक्त पदे पुढील एक महिन्यात भरण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे .तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्रात्यक्षिक बॅच 30 ऐवजी वीस विद्यार्थ्यांची असावी अशी मागणी केली आहे ,अशी माहिती विधान परिषदेतील आमदार जयंत आसगावकर यांनी गुरुवारी (ता.13 )आकुर्डी येथे केले .
आमदार आसगावकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये भेट दिली .तेथील शिक्षकांचे प्रश्न समस्या, समजून घेतल्या. तसेच शिक्षकांशी संवाद साधला.
श्री म्हाळसाकांत विद्यालयामध्ये झालेल्या सभेत आमदार आसगावकर यांनी सांगितले ,पोर्टल द्वारे शिक्षकांची भरती पुढील एक महिन्यात करावी अशी मागणी केली आहे. तसेच विज्ञान विभागातील प्रात्यक्षिकांची बॅच 30 विद्यार्थ्यांची करण्यास आम्ही विरोध दर्शवला आहे. इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया योग्य प्रकारे कशी होईल आणि अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांवर अन्याय होणार नाही, यासाठी शिक्षण संचालकांशी संवाद साधलेला आहे.
श्री म्हाळसाकांत विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे यांनीही शिक्षकांच्या विविध समस्यांबद्दल माहिती सांगितली. म्हाळसाकांत विद्यालयाचे उपप्राचार्य शशिकांत सात्रस ,उपमुख्याध्यापिका सुरेखा पठारे ,पर्यवेक्षिका दीपा पारवे ,विभावरी अभंग, संध्या काळे, व्यवसाय विभाग प्रमुख सुभाष पाटील व इतर उपस्थित होते.
प्राध्यापक संतोष बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले शिवराज वायचळ यांनी आभार मानले.
शिक्षकांनी मांडल्या व्यथा .लवकरच समस्या सोडविणार-आमदार जयंत आसगावकर
शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या .शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी स्लीप ,24 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत, असल्याची शिक्षकांची माहिती.