जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
राजकारण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 25 August 2026

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या देहू नगरपंचायत च्या नगराध्यक्षा पूजा दिवटे यांचा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा

आमदार सुनील शेळके आणि देहू नगरपंचायत च्या सर्व सदस्यांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात भरपूर साथ दिली. त्यामुळे देहूचा विकास करता आला .

देहू : देहू नगरपंचायत च्या नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी मंगळवारी( ता.25 )आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सुपूर्त केला. वैयक्तिक आणि घरगुती कारणामुळे राजीनामा दिल्याचे पूजा दिवटे यांनी सांगितले.
देहू नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक हाती सत्ता आहे .17 पैकी 17 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. देहू नगरपंचायत चे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती जमाती महिलासाठी राखीव होते. त्यामुळे सुरुवातीचे दीड वर्ष स्मिता चव्हाण यांना संधी मिळाली. त्यानंतर पूजा दिवटे यांना तीन वर्ष दोन महिने संधी मिळाली.
देहू नगरपंचायत च्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल येत्या डिसेंबरला पूर्ण होत आहे . गेले तीन वर्ष दोन महिने पूजा दिवटे या नगराध्यक्षपदी विराजमान होत्या.
पूजा दिवटे यांनी सांगितले,आमदार सुनील शेळके आणि देहू नगरपंचायत च्या सर्व सदस्यांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात भरपूर साथ दिली. त्यामुळे देहूचा विकास करता आला . भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची देहू नगरपंचायत मध्ये सत्ता येण्यासाठी प्रयत्न करणार आहे.