देहू: देहू आणि परिसरातील नागरिकांसाठी, वाचकांसाठी देहू संतवाणी च्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत परिसरातील घडामोडींचे वृत्त पोचवत आहोत. यासाठी आपण केलेले सहकार्य अत्यंत मोलाचे आहे .दीड महिन्याच्या प्रवासानंतर आम्ही देहू माळवाडी, विठ्ठलवाडी, आळंदी ,चाकण, देहूरोड, पिंपरी चिंचवड परिसर, मावळ तालुक्यात आणि पुणे शहरामध्ये आपल्या सहकार्याने पोहोचलेलो आहोत. आम्ही वाचकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे.
वाचकांनी आपल्या समस्या, आपल्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. त्यास यशही आलेले आहे .परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक, लघुउद्योजक यांच्यासाठीही आम्ही अल्प दरात जाहिरात सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. या सेवेचा लाभ ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी होत आहे. आपण आपल्या जाहिराती, मनोगत, आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, आपल्या व्यवसायाची माहिती देहू संतवाणीच्या माध्यमातून पोचवू शकता. कारण हे आपले छोटे पण प्रभावी, लगेच वाचकांपर्यंत पोहोचणारे माध्यम आहे. आपण या व्यासपीठाचा फायदा समाज परिवर्तनासाठी करून घ्यावा, अशी आपल्याला देहू संतवाणी मीडिया ग्रुपच्या माध्यमातून विनंती आहे. आम्ही आमचे कार्यालय देहू येथील परंडवाल चौकात आनंदी विहार, शॉप नंबर पाच, अनघडशा बाबा दर्ग्याजवळ , श्रीक्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे, या ठिकाणी सुरू केलेले आहे.
आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर
!! देहू संतवाणी!!
देहू संतवाणी वाचकांचे हक्काचे व्यासपीठ
देहू परिसरातील नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध. आपल्या समस्या, आपल्या तक्रारी, आपल्या व्यवसायाची माहिती देहू संतवाणी न्यूज वेब पोर्टलच्या माध्यमातून पोहोचवा