देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रखडलेल्या विविध विकास कामासंदर्भात लवकरच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामे मार्गी लावू, असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी सिद्धिविनायक नगरी मधील शिष्टमंडळाला मंगळवारी(ता.25)दिले .
सिद्धीविनायकनगरी ते परमार कॉम्प्लेक्स पर्यंतच्या पाणी,रस्ता व इतर महत्वाची कामे मार्गी लावावी, म्हणून आमदार सुनिल शेळके यांच्याकडे मागणी केली.
यावेळी आमदार सुनील शेळके यांनी सांगितले, आपण लवकरात लवकर देहूरोड कॅं.बोर्ड मधील संबंधित सर्व अधिकाऱ्यांबरोबर मिटींग लावून रखडलेली सर्व कामे मार्गी लावण्यात येतील.
यावेळी तानाजी काळभोर , सुधीर ढगे पाटील , योगेश काळभोर व इतर उपस्थित होते.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रखडलेल्या विविध कामासंदर्भात लवकरच बैठक
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सिद्धिविनायक नगरी व इतर परिसरातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.