देहूरोड : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीदरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा कर्नाटकचे आमदार श्रीनिवास मानेजी यांची देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भेट घेण्यात आली. यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर मारिमुत्तू, कार्याध्यक्ष व्यंकटेश कोळी, सचिव बबन टोपे, किसान सेलचे अध्यक्ष संभाजी पिंजण आणि युवा नेते विष्णू नरसप्पा उपस्थित होते.
बैठकीत ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच अभियानाचा उद्देश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
मत वाचवा – देश वाचवा’ अभियानासाठी देहूरोड काँग्रेसची आढावा बैठक
काँग्रेस भवनात अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग