जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक वेदांत पी 13 May 2026

देहू नगरपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमणांवर कारवाई होणार

मे महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात देहूत दाखल होत आहेत.तसेच आधिक मास सुरू होत आहे.अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

देहू: सरकारी जागेत आणि फूटपाथ वर अतिक्रमण केलेल्या दुकानदार आणि व्यावसायिकांनी येत्या सात दिवसांत अतिक्रमण काढून घ्यावीत, अशा नोटीस देहू नगरपंचायत अतिक्रमण विभागाकडून बुधवारी(ता.13)बजावण्यात आल्या आहेत.
देहू नगरपंचायत हद्दीत अनेक रस्त्यावरील फूटपाथ वर भाजीपाला, वडापाव,चहाची टपऱ्या उभारलेल्या आहेत.संत तुकाराम महाराज देऊळवाड्यासमोरही हीच अवस्था आहे.गाथा मंदिर परिसरात फूटपाथवर भाजी विक्रेत्यांकडून अतिक्रमण झालेले आहे.
सध्या मे महिना, आधिक मास मुळे भाविकांची संख्या वाढत असून वाहतूक कोंडी होत आहे.तसेच पालखी सोहळा लवकरच आहे.या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे. देऊळवाड्यासमोरील फूटपाथ वरील प्रसाद विक्रेते यांना नोटीस बजावण्यात आली आहे.तसेच सात दिवसांत अतिक्रमण काढा, नाहीतर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे नोटीस मध्ये बजावण्यात आले आहे.