जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 01 September 2026

पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील नविन पूल लवकरच सुरू होणार

दोन नवीन पुलावरील सिमेंट काँक्रिटीकरण लवकरच पूर्ण होऊन हे पूल वाहतुकीस खुले करण्यात येणार आहे .त्यानंतर जुना पूल पाडण्यात येईल.

देहू: देहू देहूरोड पालखी मार्गावरील परंडवाल चौक येथील दोन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. नव्याने बनविण्यात आलेले दोन पुलावरील कॉंक्रिटीकरण झाल्यानंतर हे पूल वाहतुकीस पूर्णपणे खुले होतील, अशी माहिती देहू नगरपंचायत चे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दिली.
चेतन कोंडे यांनी मंगळवारी(ता.1) पुलाची पाहणी केली. यावेळी बांधकाम अभियंता संगपाल गायकवाड ,वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री. चौधरी, गटनेते योगेश परंडवाल, बांधकाम समिती सभापती आदित्य टिळेकर, नगरपंचायत सदस्य प्रवीण काळोखे व ठेकेदार उपस्थित होते.
मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी सांगितले, एका पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. दुसऱ्या पुलाचे जोडकाम व संरक्षण भिंत लवकरच बांधण्यात येईल .तसेच जुना पूल लवकरच पाडण्यात येईल. सध्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपी बाजूला हटविण्यात येणार आहे.