जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 01 September 2026

भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रथमेश भाऊ आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन

महिला साठी ५ लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना वॉशिंग मशीन , एल. इ .डी .टीव्ही ३२ इंच , गॅस शेगडी, साउंड बार व इलेक्ट्रिक कुकर शेगडी देण्यात येणार आहे .

देहू: भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त देहू परिसरात श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा आणि दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या शुक्रवारी (ता. 4) श्रीकृष्ण जन्म सोहळा आहे. यानिमित्त माळवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे .तसेच दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आहे. यावेळी दहीहंडी उत्सव आहे.
देहूतील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश भाऊ आहिरे यांच्यावतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार (ता.७) सप्टेंबर २०२६ सायं:६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक. गोपाळपूरा. देहू नगरपंचायत कार्यालय समोर हा उत्सव होणार आहे.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर, पिंपरी चिंचवडचे सहा. पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड ,देहूरोड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,
नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक संदीप वाघीरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, वरळेचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र कडलक,
देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विवेक काळोखे , नगराध्यक्ष,
उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या उत्सव सोहळ्यात अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि लावणी सम्राट सायली पाटील प्रमुख आकर्षण असणार आहे.
महिला साठी ५ लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना वॉशिंग मशीन , एल. इ .डी .टीव्ही ३२ इंच , गॅस शेगडी, साउंड बार व इलेक्ट्रिक कुकर शेगडी देण्यात येणार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन
प्रथमेश प्रमोद आहिरे मित्र परिवार व यु जी एस ग्रुप ऑफ कंपनी यांनी केले आहे.