जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 06 September 2026

देहू विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदकुमार काळोखे बिनविरोध

विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबविणार . कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांना सातबारा वरील बोजा उतरवण्यासाठी तत्काळ मदत करणार- नंदकुमार काळोखे

देहू: देहू मजरे माळवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नंदकुमार उर्फ शशिकांत हरिभाऊ काळोखे यांची बिनविरोध निवड झाली. रविवारी (ता.6) सोसायटीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवड एक वर्षासाठी आहे.
संतोष शिंगाडे निवडणूक निर्णय अधिकारी होते.
यावेळी कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष शांताराम शेवकर, जेष्ठ संचालक अभिमन्यू काळोखे, संचालक गुलाब काळोखे ,सतीश काळोखे, राजू काटे, प्रीतम वारघडे, पांडुरंग काळोखे, विठ्ठल काळोखे, सुरेश हगवणे,
दुर्गाजी चव्हाण ,धनंजय मुसडगे, सचिव गजानन रणपिसे, संचालिका बेबी हगवणे, कल्पना मोरे व इतर उपस्थित होते.
विद्यमान सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र काटे यांनी नुकताच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेवर आज निवडणूक प्रक्रिया पार पडली .या निवडणुकीसाठी संचालक प्रीतम वारघडे व नंदू काळोखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र प्रीतम वारघडे यांनी अर्ज मागे घेतल्याने नंदकुमार काळोखे यांची बिनविरोध निवड झाली.