जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 17 August 2026

यशस्वी अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

देहूतील यशस्वी अभ्यासिका ही देहू आणि परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी आणि अभ्यास करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

देहू: स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य , सतत मेहनत आणि वाचन करत राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशस्वी अभ्यासिकेचे मार्गदर्शक प्रकाश कांबळे यांनी रविवारी (ता 16 )देहू येथे केले.
यशस्वी अभ्यासिका मधील विद्यार्थिनी अश्विनी पंडीत यांची पुणे जिल्हा बँकेत लेखनिक पदी व माजी सैनिक संजय सोनमाळे यांची मुंबई शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
अमर पातोंड इयत्ता १०वी CBSE बोर्ड परीक्षे मध्ये ९४.७ टक्के गुण मिळवले. अंकुल गोळे याने CA Foundation course मध्ये प्रथम श्रेणीत गुण मिळवले. वैभव वडागळे याने अभियांत्रिकी परिक्षेत चांगल्या मार्कने पास होत अव्वल स्थान मिळवले.
वैष्णवी राऊत हिने नीट परिक्षेत ४३८ गुण प्राप्त केले आहेत. या बद्दल सर्व विद्यार्थांचा अभ्यासिकेच्या संचालीका मंगल कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगशिक्षक किरण साळुंखे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अभ्यासात एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक शांतता वाढविण्यासाठी योग व प्राणायामाचे महत्त्व स्पष्ट केले. यशाची पंचसूत्री सांगत त्यांनी निरोगी शरीर व प्रसन्न मनासाठी दैनंदीन जीवनात विद्यार्थ्यांनी नियमित सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला दिला.