देहूरोड : येथील केंद्रीय आयुध भंडाराचा ८४ वा वर्धापन दिन १ ऑक्टोबर रोजी आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी( ता. २८ ) डेपोमध्ये भव्य मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात मेडिकव्हर हॉस्पिटल, इंद्रायणी नगर, भोसरी यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. डेपोतील ‘वर्क्स कमिटी’च्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज मोटिव्हेशनल हॉल येथे हे शिबीर पार पडले.
या शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांसाठी ईसीजी , रक्त तपासणी , रक्तदाब तपासणी , बीएमआय , नेत्र तपासणी तसेच हाडे व सांधे तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला व मार्गदर्शन अशा विविध आरोग्य तपासणी सुविधा विनामूल्य पुरवण्यात आल्या. डेपोतील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तपासणी करून घेतली.
शिबिरामध्ये मेडिकव्हर हॉस्पिटलच्या तसेच डेपोतील डॉ. प्रेरणा, महेंद्र चौधरी, औषध विभागाचे सुहास कुमार यांच्यासह रोशन कुमार,हॉस्पिटलचे परिचारिका यांनी वैद्यकीय सेवा दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डेपो प्रशासनासह वर्क्स कमिटीचे चेअरमन लेफ्टनंट कर्नल कनिका सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाईस चेअरमन उमाकांत लिलाकर, सेक्रेटरी संजय डुमडे , कमिटीचे सदस्य निलेश भेगडे, विकास बालघरे, विक्रम टकले , संतोष शितकल आणि शब्बीर इनामदार यांनी परिश्रम घेतले.
केंद्रीय आयुध भांडार येथे ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
सीओडी डेपोच्या 84 व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन. 500 कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ.