जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 03 September 2026

देहूरोड सेंट्रल चौकातील वाहतूक कोंडी सोडवा .पोलीस आयुक्तांना पत्र

पुणे मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौकात वाहतूक कोंडी आणि देहू आळंदी रस्त्यावरील काळोखे चौकात कमान बांधकाम संथ गतीने सुरू त्यामुळे वाहतूक कोंडी.

देहूरोड: मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी देहू देहू रोड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे.
ज्येष्ठ नेते गुरमीत सिंग रत्तू, शहराध्यक्ष रघुवीर शेलार, तुकाराम जाधव, लहू मामा शेलार, उमाशंकर सिंग, अनिरुद्ध काळोखे, संभाजी टिळेकर, सचिन मराठे, दत्ता हगवणे, मयूर शेलार, अक्षय मुऱ्हे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेऊन मुंबई–पुणे महामार्गावरील देहूरोड शहरालगत सेंट्रल चौकाजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येबाबत माहिती दिली.
तसेच या ठिकाणी वारंवार होणाऱ्या ट्रॅफिकमुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी, कामगार तसेच रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून दैनंदिन प्रवासावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. देहू–आळंदी रस्त्यावरील वरील काळोखे चौकाजवळ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत असलेल्या कमानीचे सुशोभीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याबाबतही निवेदन देण्यात आले. या कामामुळे सदर ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होत असून मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे. दोन्ही विषयांवर तातडीने योग्य उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.