देहू: अनेक महिन्यांपासून रखडलेले पुलाचे काम रविवारी जोमाने सुरू होते पुलाचे काम व्हावे, यासाठी सोमवार( ता. 24) देहू शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार होते.
देहू नगरपंचायत प्रशासनाने देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौकामध्ये साडेपाच कोटी रुपये खर्च करून पुलाचे रुंदीकरणाचे काम एक वर्षांपूर्वी सुरू केले होते. या पुलाची मुदत जून अखेर होती. मात्र सतत होणाऱ्या पावसामुळे या पुलाचे काम रखडले. त्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि पुन्हा पाऊस यामुळे या पुलाचे काम रखडलेले होते. मात्र गेले दोन महिन्यापासून विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने पुलाचे काम सुरू करून फुल वाहतुकीस खुला करावा, अशी वारंवार मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर अखेर पुलाच्या एका बाजूने जोडणी करण्यात आली असून फुल एका बाजूने लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. रविवारी ठेकेदाराकडून पुल जोडणीचे काम करण्यात आले.
देहू परंडवाल चौकातील पुलाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार
देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील पुलाचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात आहे .हे काम लवकरच पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल.