जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 16 August 2026

स्वातंत्र्य दिनानिमित्त देहू लोणारी समाज सेवा संघातर्फे रक्तदान महायज्ञ उत्साहात संपन्न

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 188 जणांनी रक्तदान केले.

देहू : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोणारी समाज सेवा संघ, देहू यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान महायज्ञ 2026 आयोजित करण्यात आले होते.या या रक्तदान शिबिरात 188 जणांनी रक्तदान केले.
संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या शिबिरास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे , भाजपचे शहराध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, देहू नगरपंचायतचे नगरसेवक प्रवीण काळोखे आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत १८८ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या कार्यात योगदान दिले. प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. शिबिर यशस्वी केल्याबद्दल लाईफ लाईन ब्लड सेंटर या ब्लड बँकेच्या वतीने संघाचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.लोणारी संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक व समाजबांधवांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.