जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
राजकारण ताज्या बातम्या वेदांत पी 02 August 2026

तुकोबांच्या अभंगवाणीतून समाजाला दिशा- जयकुमार गोरे भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

तीर्थक्षेत्र देहूच्या विकासासाठी निधी देणार . संत तुकाराम महाराज यांचे राहते घर आणि इनामदार वाडा विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 34 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

देहू: तुकोबांनी समाजाला दिशा देण्याचे काम अभंगातून केले ,असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी (ता.31) देहू येथे केले.
देहू देहूरोड शहर भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, बाळासाहेब काळोखे ,रामदास काकडे, गणेश भेगडे, लहू शेलार, गुलाबराव माळसकर व इतर व्यासपीठावर उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ज्याला देव पाहायचा असेल त्याने तुकोबा माऊलींच्या वारीत एकदा तरी आले पाहिजे. यंदाच्या वारी सोहळ्यात लाखो ने सहभागी झालेल्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती त्यांच्या आदेशानुसार देहू ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर वारी मार्गावर आणि पंढरपुरात प्रशासनाने योग्य सुविधा पुरविल्या. भविष्यात देहूच्या विकासासाठी भाजपाचे नगरसेवक देहू नगरपंचायत मध्ये निवडून आणा, असे आवाहनही त्यांनी केले.
देहू मध्ये इनामदार वाडा आणि पालखीतळाचा विकास करताना कोणताही निधी कमी पडू देणार नाही. रघुवीर शेलार यांनी प्रास्ताविक केले. प्रद्युम्न टिळेकर, संभाजी टिळेकर,
सचिन मराठे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे संदीप परंडवाल तात्या पचपिंड स्वामी शेवकर शकुंतला अग्रवाल यांनी आयोजन केले होते.