जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 24 August 2026

देहू नगरपंचायत च्या आश्वासनानंतर भाजपचे रास्ता रोको आंदोलन स्थगित

भाजपचे रस्ता रोको आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित. परंडवाल चौकातील रस्ता लवकरच खुला होणार .

देहू :देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील रस्ता आणि पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात देहू-देहूरोड भारतीय जनता पक्ष शहर मंडलाच्या वतीने सोमवारी( ता.24 ) सायंकाळी 5वाजता‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, देहूरोड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले .
भाजप मंडल अध्यक्ष रघुवीर शेलार , भाजप युवा मोर्चा अध्यक्षअनिरुद्ध काळोखे, प्रदेश माथाडी कामगार उपाध्यक्ष संभाजी टिळेकर, सचिन मराठे, नारायण पंचपिड , सांस्कृतिक आघाडी चे अध्यक्ष संदीप परंडवाल, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ऋतिक मोरे ,दत्ता हगवणे ,
अजय तेलगू ,सूर्यकांत घोलप, अभिजीत जाधव आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
प्रशासनाचे मुख्य आश्वासन:
चर्चेदरम्यान पोलीस अधिकारी विक्रम बनसोडे व मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी परंडवाल चौकातील एका बाजूचा पूल नागरिकांच्या वाहतुकीसाठी लवकरच सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच, दुसऱ्या पुलाचे कामही जलद गतीने पूर्ण करून संपूर्ण रस्ता प्रवाशांसाठी खुला करण्याचे तसेच ट्राफिक नियंत्रणासाठी प्रत्येक चौकात दिवसभर एक माणूस वाहतूक नियंत्रणासाठी राहील ,असे आश्वासन सर्वांसमक्ष दिले. यावेळी नगराध्यक्ष पूजा दिवटे उपाध्यक्ष योगेश काळोखे गटनेते योगेश परंडवाल बांधकाम समिती सभापती आदित्य टिळेकर उपस्थित होते.
आंदोलन स्थगिती आणि इशारा:
वेळेत काम न झाल्यास किंवा प्रशासनाने दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलन निश्चितपणे केले जाईल, असा इशाराही भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.