जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या एम.डी.पी. 10 October 2026

सांगवी: बाबुरावजी घोलप विद्यालयात कापडी पिशवी रंगकाम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

१६० विद्यार्थ्यांचा सहभाग; प्लास्टिकमुक्त भारताचा संदेश

सांगवी :पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ‘बीइंग व्हॉलंटिअर’ (Being Volunteer) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवीवर रंगकाम स्पर्धेचे शुक्रवार
(ता.9 )उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते नववीतील १६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पर्यावरण जनजागृती, प्लास्टिकमुक्त भारत आणि ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शालेय स्तरावरील कार्यानुभव विषयांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्यांवर विविध रंगांच्या माध्यमातून आकर्षक चित्रे साकारत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या उपक्रमासाठी आवश्यक कापडी पिशव्या आणि रंगांचे साहित्य ‘बीइंग व्हॉलंटिअर’ संस्थेकडून विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
प्राचार्य अजिनाथ ओगले, उपप्राचार्या मेघा पोटे, पर्यवेक्षक चंद्रशेखर वाघमारे, संस्थेच्या समन्वयक नीलम नागुल, व्यवस्थापक *मानसी गोखले*, मीडिया डिझायनर *शामल कोळी*, वित्त विभाग प्रमुख मनीषा सावंत, तसेच अंजली देशमुख, इंद्राणी शोंगे आणि जान्हवी दवंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले.
विद्यालयातील सर्व शिक्षक आणि संस्थेच्या स्वयंसेवकांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.