जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 19 August 2026

जलसंवर्धन व स्वच्छता अभियानातून आर्मी पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी दिला जनजागृतीचा संदेश

या अभियानातून परिसर स्वच्छतेसोबतच “स्वच्छता हीच सेवा” आणि “पाणी वाचवा, जीवन वाचवा” हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

निगडी प्राधिकरण : गणेश तलाव परिसरातील वीर सावरकर उद्यान, निगडी प्राधिकरण तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी घाट व मंदिर परिसरात जलसंवर्धन व स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.
देहूरोड येथील आर्मी पब्लिक स्कूल वतीने आयोजित या अभियानात ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छता व जलसंवर्धनाचा संदेश दिला.
या अभियानांतर्गत गणेश तलाव, चिंचवड येथील मोरया गोसावी महाराज मंदिर परिसर आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. तसेच विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून पाणी व स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यानी बिया देवून झाडे लावा, असा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गणेश तलाव परिसरातील अभियानास पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष सहभाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. तसेच चिंचवड येथील अभियानात विरोधी पक्ष नेते म भाऊसाहेब भोईर आणि सुरेश भोईर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी वसुंधरा विषयी शपथ सर्वांनी घेतली .
या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच मोरया गोसावी मंदिर ट्रस्टचे मंदार देव महाराज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. साबळे , मुकेश जगताप आणि संतोष सुर्वे तसेच पीसीएमसीच्या इतर कर्मचारीवर्गाने अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.उपक्रमासाठी मुख्याध्यापिका पारोमिता नंदी, उपमुख्याध्यापिका मेघा शिदोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.
या अभियानात आर्मी पब्लिक स्कूलचे शिक्षका लीना आढाव, अनिता चटर्जी, मनिषा खचराने, स्वप्नील शिंदे आणि रोहित साळवी हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात आलेल्या या अभियानातून परिसर स्वच्छतेसोबतच “स्वच्छता हीच सेवा” आणि “पाणी वाचवा, जीवन वाचवा” हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.