जाहिरातीसाठी संपर्क करा
06 September 2026
← मुख्यपृष्ठ
राजकारण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 02 September 2026

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रावेत किवळे मामुर्डीत आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन

आमदार आपल्या दारी या उपक्रमातून नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे.

विकासनगर : चिंचवड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 16 रावेत ,किवळे, मामुर्डी या भागातील विविध नागरी समस्या समजून घेण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम गुरुवार (ता. 3) समीर लॉन्स येथे सकाळी दहा ते चार राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी दिली. नागरिकांनी आपल्या समस्या निवारण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान नगरसेवक धर्माबाद तंतरपाळे यांनी केले आहे.