जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 02 October 2026

आळंदी विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी अकादमी सील

नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील केली. या कारवाईवेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित

आळंदी : दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेकडून शहरातील कोचिंग क्लासेस व विविध आस्थापनांची पाहणी सुरू आहे.
या पाहणीअंतर्गत नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमी कोचिंग क्लासेसच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीच्या जुना मालमत्ता क्रमांक ११३७ व नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी सुरू असल्याचे निदर्शनास आले.
नगरपरिषदेच्या अभिलेखानुसार सदर आस्थापनाने आवश्यक व्यवसाय परवाना अथवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे लागू कायदे व नियमांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील केली. या कारवाईवेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आस्थापनांनी आवश्यक परवानग्या घेऊन नियमांचे पालन करावे, तसेच नगरपरिषदेकडील लागू कायदेशीर तरतुदींची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.