जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 16 October 2026

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ ह.भ.प. लक्ष्मण विष्णू अभंग यांचे निधन

ह.भ.प. लक्ष्मण विष्णू अभंग हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व होते. ते नियमितपणे आळंदी व पंढरपूरची वारी करीत असत. विठ्ठलभक्ती आणि वारकरी परंपरेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते.

पारगाव : पारगाव तर्फे खेड, ता. आंबेगाव येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ ह.भ.प. लक्ष्मण विष्णू अभंग (वय १०२ वर्षे) यांचे निधन झाले.
ह.भ.प. लक्ष्मण विष्णू अभंग हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व होते. ते नियमितपणे आळंदी व पंढरपूरची वारी करीत असत. विठ्ठलभक्ती आणि वारकरी परंपरेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कार्यालयीन अधीक्षक सिताराम अभंग यांचे ते वडील होत.
दशक्रिया विधी शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पारगाव तर्फे खेड, ता. आंबेगाव येथे वेळ नदीच्या तीरावर होणार आहे.